Saturday, April 20, 2024

/

बेळगावच्या इतिहासात हे होणार पहिल्यांदा

 belgaum

बेळगाव ची उद्यमबाग ही औद्योगिक वसाहत आपली एक वेगळी ओळख तयार करून आहे. या औद्योगिक वसाहतीच्या इतिहासात आगळीवेगळी कामगिरी करून दाखविण्याची किमया लिओ इंजिनिअर्स या कंपनीने केली आहे.उद्योजक आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या साठी सुद्धा ही किमया महत्त्वाची ठरणार असून याकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.

उद्यमबागच्या इतिहासात पहिला वहिला हा उपक्रम ठरणार आहे. वीज निर्मिती करणाऱ्या वाफेच्या टर्बाइनचे बेळगावमध्ये नूतनीकरण केले जाईल. बेळगाव करांसाठी हा अभिमानाचा क्षण असेल.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकलचे विद्यार्थी स्टीम टर्बाइनचे अंतर्गत भाग आणि नूतनीकरण नाही करण्याची प्रक्रिया पाहू शकतात. बेळगावचे उद्योजक असलेल्या जयदीप बिर्जे यांच्या लिओ इंजिनियर्स ने हे काम सुरू केले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच यासंदर्भात उत्सुकता असणाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.बेळगावच्या उद्योजक हे कोठेच मागे नाहीत हे सांगून देणारी ही घटना असून या बद्दलची माहिती जयदीप बिर्जे यांनी बेळगाव लाईव्ह ला दिली आहे.

Lio engneers

वाफेवर चालणारी आणि विज निर्मिती करणारी मशीन (यंत्र) उद्यमबाग औद्योगिक परिसरात प्रथमच दुरुस्ती साठी आली आहे. 1000 Kw प्रती तास वीज तयार करणारी मशीन बेळगावच्या औद्योगिक क्षेत्रात प्रथमच आली आहे. याआधी दुरुस्तीची कामे बेंगळूर, चैन्नई, मुंबई, दिल्ली, पुणे येथे होत असत.
पण लियो इंजिनिअर्स, बेळगाव या कंपनीने ही मशीन बेळगाव येथे दुरुस्त करून मापोटी, मोझाबिया येथे पाठविण्याची जबाबदारी घेतली आहे.

या कामासाठी स्टीम टरबाइन वर दोन पेटंट्स असलेले Ex Skoda व GE Turbine मधे R&D Head सध्या इंजिनिअर्सचे डीझायनर Head उपेंद्रा प्रभु नाथ हे काम करणार आहेत

“हे टरबाईन दुरुस्त करण्यासाठी लिओ इंजिनिअर्सचे संचालक श्री जयदिप बिर्जे यांनी दुबईच्या Macrocom
कंपनीबरोबर करार केला आहे.

21 दिवसात हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी लिओ कंपनीने घेतली आहे. “नो प्रोफ़िट नो लॉस ” ह्या तत्वावर, हे काम लोओ कम्पनी ने स्वीकारले आहे. कारण याचा फायदा बेळगावच्या उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रामध्ये व्हावा झाल्यामुळे येथील एंजिनीरिंग युवकांना टर्बाइन पहाण्यास मिळावा, बेळगांव येथे टर्बाइन्सचे भाग तयार व्हावेत “लोकल फ़ॉर वोकल” “स्टार्टप” च्या संध्या उपलब्ध व्हावेत ही महत्त्वकांशा इंजिनिअर्सचे संचालक श्री जयदिप बिर्जे यांना व्यक्त केली आहे.

हे काम पूर्ण करण्यासाठी अश्विन दड्डीकर(B.E Mech) , निरंजन मुचंडी(M.tech, PhD) , राहूल – अॅड. स्नेहा कळघटगी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.