किरण निप्पाणीकर सामाजिक कार्यकर्ते यांना शाळा प्रशासनाकडून कॅन्टोन्मेंट शाळेच्या वर्ग खोल्यांचे काळे फलक दुरुस्त करण्यासाठी मिळालेल्या विनंतीनुसार 14 ग्रीन बोर्ड मदत म्हणून देण्यात आले. ही शाळा शहरातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे यामुळे लागलीच ही विनंती पूर्ण करण्यात आली.
किरण निप्पाणीकर, कपिल शिराळकर, व्यंकटेश भंडारी, दिनेश पाटील आणि त्यांच्या मित्रांनी कॅन्टोन्मेंट स्कूलला 65,000/- किमतीचे उच्च दर्जाचे 14 ग्रीन क्लास रूम बोर्ड प्रमुख पाहुणे अशोक शिंत्रे (क्रीडा भारती), आनंद यांच्या उपस्थितीत दिले. सुधीर तुप्पेकर (नामनिर्देशित सदस्य) रोहित देशपांडे, सौ प्रियंका पेटकर, सतीश मन्नूरकर, खादर अमरावती (मुख्याध्यापक) आणि कॅन्टोन्मेंट कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अशोक शिंत्रे म्हणाले .”शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि त्यासाठी शाळेतील पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत.
सुविधांच्या अभावामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत. यासाठी मदत केलेल्या देणगीदारांचे त्यांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले.