दरमहा पैसे भरा आणि एका वर्षाने सवलतीच्या दरात दागिने मिळवा अशी जाहिरात करून दागिने नाहीत आणि पैसे परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सराफी व्यावसायिका विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
पैसे देऊनही दागिने दिले जात नाहीत तसेच पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या संदर्भात मार्केट पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे.दांडेली येथील महांतेश नागनुर या व्यक्तीने ही तक्रार दिली असून खडेबाजार येथील एका सराफी पेढी ने दर महा बारा हजार रुपये भरून घेतले.
तीन वर्षात त्यांनी एकूण चार लाख 41 हजार रुपये भरले आहेत. पैसे भरून नंतर दागिने बनवून देण्याची ही योजना होती. योजनेची मुदत संपल्यानंतर 4 लाख 41000 च्या बदल्यात एक नेकलेस व दोन बांगड्या करून देण्यास सांगितले.
25 ऑक्टोबर 2019 रोजी दागिने बनवणेस सांगण्यात आले. 25 नोव्हेंबर पर्यंत दागिने देण्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते .ठरलेल्या मुदतीत दागिने देण्यात आले नाहीत. 5 डिसेंबर रोजी दागिने देण्याची सांगून त्या दिवशी दिले नाहीत. त्यामुळे 25 डिसेंबर ची अखेरची मुदत देण्यात आली होती. असे एकापाठोपाठ तारीख दिली जात असून प्रत्यक्षात दागिने देण्यास टाळाटाळ केली जात आहे. असे तक्रारीत म्हटले आहे.
या सराफी पेढीचे चालक बेंगलोर येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून खडेबाजार येथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. दागिन्यांच्या बरोबरच रेशमी साड्या विकण्याचाही त्यांचा व्यवसाय आहे. असे त्या ग्राहकांनी सांगितले असून पोलिसांनी तातडीने चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.