देशासह महाराष्ट्रात कोरोना आणि ओमीक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाश्यांना डबल डोस सह आर टी पी सी आर निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
रविवारी दुपारी बेळगाव विमान तळावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.बेळगांव मुंबई या मार्गावर नेहमी वर्दळ असते त्यामुळे आम्ही यावर लक्ष केंद्रित करून आहोत. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे काळजी घेण्याचे कारण आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
डबल डोस आणि निगेटिव्ह अहवाल असल्यास महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्याना प्रवेश ध्या अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत बेळगांव जिल्ह्यासह विजापूर जिल्ह्यात महाराष्ट्र सीमेवर 11 चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. बेळगांव जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याचे हित समोर ठेऊन आम्ही कठोर निर्बंध आणि निर्णय देखील घेणार आहोत असे त्यांनी यावेळी म्हटले.
मागील वर्षीच्या लॉक डाऊन काळात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवढा भासला होता त्याची कमी पूर्ण करण्यासाठी आम्ही ऑक्सीजन प्लांट आणि कंपन्यांसाठी संपर्क केला आहे याशिवाय राज्यात 4 हजार हुन अधिक आय सी यु बेड तर जिल्हा आणि तालुका पातळीवर देखील बेड संख्या वाढवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत असेही बोम्मई यांनी बजावले आहेत.