प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी अभिनव कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी त्यांनी मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती केली. शहापूर पोलीस ठाण्यासमोरील मार्गावर हे जनजागृती अभियान राबविण्यात आले.
दुचाकी वाहन चालविताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करा आणि कोरोना व ओमायक्रोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करा असा संदेश देत शहापूर भागात या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विना मास्क फिरून स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू नका.
मास्क आणि सॅनिटायझेरचा वापर करा असा संदेशही यावेळी विद्यार्थ्यांनी दिला. तसेच विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना थांबून त्यांनी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहनही केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शहापूर पोलीस स्थानकासमोरील मार्गावर थांबून विना मास्क फिरणाऱ्या लोकांना मास्कचे वितरण केले.
सक्षम जाधव, अनुष्क पाटील, विनायक बांदिवडेकर, गणेश मजुकर, प्रथम मजुकर, आदित्य कांबळे, मानसी धोत्रे यासह अन्य विद्यार्थ्यांनी या जनजागृती अभियानात भाग घेतला होता.