Tuesday, December 24, 2024

/

अंध मुलांकडून ‘यांना’ मिळाली वाढदिवसाची अनपेक्षित भेट

 belgaum

बेळगाव शाहूनगर येथील समन्वय ब्लाईंड फौंडेशन संचालित अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी अनपेक्षितपणे विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजप ओबीसी युवा मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांचा वाढदिवस साजरा करून त्यांच्या सेवाभावी कार्याची पोचपावती दिली.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा दि. 12 जानेवारी हा वाढदिवस आणि योगायोगाने याच दिवशी सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांचाही वाढदिवस होता. हाच सुवर्णयोग साधून समन्वय ब्लाईंड फौंडेशन संचालित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी किरण जाधव यांचा वाढदिन साजरा करून या सामाजिक कार्यकर्त्याच्या सेवाभावी कार्याची पोहोचपावती दिली. याप्रसंगी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी, खानापूर भाजपचे संजय कुबल, कोचेरी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली. सदर जयंतीनंतर किरण जाधव कार्यक्रमामधून निघत असताना विद्यार्थ्यांनी त्यांना थांबवून यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.Kiran jadhav

तसेच त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी वाढदिवस साजरा केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनीही किरण जाधव यांना शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य चिंतिले आणि भविष्यात सर्वोच्च पदापर्यंत मजल मारून समाजहितासाठी अधिकाधिक कार्य घडो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

या अनपेक्षितपणे पार पडलेल्या आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाने किरण जाधव भारावले. सर्वसामान्य जनतेची सेवा करून आपल्यापरीने सामाजिक ऋण फेडण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहू, अशी ग्वाही यावेळी किरण जाधव यांनी दिली. कार्यक्रमाला समन्वय ब्लाईंड फौंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.