बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
सध्याची वाढती थंडी लक्षात घेऊन शहरातील कपिलेश्वर मंदिर रेल्वे स्टेशन टिळक चौक आदी ठिकाणी या उपक्रमाद्वारे फेस मास्कसह 151 ब्लँकेट्स मोफत वाटण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, निरंजन अष्टेकर, परशराम काकतकर, पिराजी शिंदे, प्रकाश हेब्बाजी, विनायक जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.