Friday, May 24, 2024

/

शहरात दगडाने ठेचून रिक्षाचालकाचा खून

 belgaum

गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या रुक्मिणीनगर येथील एका युवा ऑटोरिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी शहरातील गांधीनगरनजीक उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नोहान नासिर धारवाडकर (वय 23, रा. रुक्मिणीनगर) असे खून झालेल्या ऑटोरिक्षाचालकाचे नांव आहे. गांधीनगरनजीकच्या मुचंडी गॅरेजजवळ एका पडक्या इमारतीत नोहान यांचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच मारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खुनाच्या तपासासाठी सायबर पोलिस व ठसे तज्ञ नाही पाचारण करण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार नोहान गेल्या शुक्रवारी सकाळी कांही कामानिमित्त घराबाहेर पडला होता.

 belgaum

मात्र दोन दिवस तो घरी परतला नसल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. त्याचवेळी रविवारी सायंकाळी गांधीनगर नजीकच्या एससी मोटर्स मुचंडी गॅरेजनजीक त्याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

नोहानचा खून कोणी व कशासाठी केला? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. निघृण खुनाच्या या घटनेचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.