Thursday, June 20, 2024

/

एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन

 belgaum

एपीएमसीचे माजी अध्यक्ष परशराम बेडका यांचे निधन-म. ए समितीचे माजी नगरसेवक आणि ए पी एम सी माजी अध्यक्ष,कलमेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष परशराम बेडका वय 60 वर्षे रा. बसवण कुडची बेळगाव यांचे शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

रात्री साडे नऊ वाजता त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचाराचा काहीही उपयोग न झाल्याने सव्वा दहा वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.

 belgaum

बेडका यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगाव एपीएमसीचे अध्यक्ष पद व कुडची भागातुन नगरसेवक पद भूषविले होते. त्यांच्या निधनाने पूर्व भागातील समितीचे जेष्ठ नेतृत्व हरपलं आहे.

बसवणं कुडची येथे कलमेश्वर सोसायटीच्या माध्यमातून अनेक गोर गरीब शेतकऱ्यांना मदत केली होती ते सहकारी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते.बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील मराठीचं समितीचे नेतृत्व हरपलं अशी भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा 2 विवाहित मुलीं,वडील,काका, भाऊ,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.रविवारी दुपारी  12 वाजता त्यांच्यावर कुडची येथे अंतिम संस्कार होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.