belgaum

कर्नाटक राज्य पोलीस सेवेतील तब्बल 26 अधिकाऱ्यांची आयपीएस अधिकारी म्हणून बढती करण्यात आली आहे.हे अधिकारी एक वर्ष प्रोबेशनवर असतील.

गृह मंत्रालयाने शुक्रवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे की त्यांना कर्नाटक केडरमध्ये समाविष्ट केले जाईल.यापैकी तिघा जणांनी बेळगाव जिल्ह्यात सेवा दिली आहे.

रवींद्र काशिनाथ गडादी यांनी बेळगावात अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून काम केले आहे. यशोधा वंटगोडी यांनी पोलीस उपायुक्त पदी सेवा बजावली आहे तर अमरनाथ रेड्डी यांनी पोलीस उपायुक्त, ए सी बी चे पोलीस प्रमुख आणि जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख या पदां वर काम केले आहे.
बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे.

चंद्रकांत एमव्ही, मधुरा वीणा एमएल, चेन्नबसवण्णा लंगोटी, जयप्रकाश, अंजली के पी, नारायण एम, मुथाराजू एम, शेखर एच टेकन्नावर, रवींद्र काशिनाथ गडाडी, अनिता भीमप्पा हद्दन्नावर, ए कुमारस्वामी, सारा फातिमा, शिवापाडीमा, रश्मी, पराद्दुम , मल्लिकार्जुन बलदांडी, अमरनाथ रेड्डी वाई, पवन नेज्जू, श्रीहरी बाबू बीएल, गीता एमएस, यशोधा वंटगोडी, राजीव एम, शोभा राणी व्हीजे, डॉ सौम्यलता एसके, कविता बीटी आणि उमा प्रशांत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.