जगभरात धुमाकूळ घातलेला ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेंरियंटने बेळगावात प्रवेश केला आहे. नायजेरिया मधून हा ओमीक्रॉन बेळगावात दाखल झाला आहे.
भारत देशात आता पर्यंत 62 जणांना कोरोना ओमीक्रॉनची लागण झाली आहे आणि आता बेळगावात हा रुग्ण दाखल झाला आहे त्याला सौम्य लक्षण असल्याची माहिती बेळगावच्या आरोग्य खात्याने दिली आहे.
बेळगावात ओमीक्रोनची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या वीस लोकांची ओळख पटवून त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे त्यांचा तपासणी अहवाल यायचा बाकी आहे.
ओमीक्रॉनची लागण झालेला व्यक्ती 52 वर्षाचा असून तो नायजेरियन रिटर्न आहे. तो 13 डिसेंबरला व्हाया हैदराबाद सांबरा विमान तळातून बेळगावला आला होता. त्याचे घश्यातील नमुन्यांची तपासणीसाठी बंगळूरला पाठवण्यात आले होते त्याचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला आहे.
बेळगावात पहिला ओमीक्रोनची लागण झालेला व्यक्तीवर जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेन्टर मध्ये उपचार सुरू आहेत