Thursday, December 19, 2024

/

यासाठी घेतली अंगडी दानवेंची भेट

 belgaum

बेळगाव कित्तूर मार्गे धारवाड या शहरांसाठी संपर्क करणारी नवी रेल्वे लाईन लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली असून लवकरात लवकर ही रेल्वे लाईन सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या ट्विटरला बेळगाव रेल्वे स्थानकाच्या तसेच नैऋत्य रेल्वेच्या ट्विटर हँडलने चांगला प्रतिसाद दिला असून माजी रेल्वे राज्यमंत्री कै सुरेश अंगडी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही रेल्वे लाईन लवकरात लवकर सुरू होण्याची गरज असून सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले आहेत.

सध्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपद रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. त्यामुळे खासदार मंगला अंगडी यांनी रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला असल्याची माहिती दिली आहे. बेळगाव ते धारवाड या दोन शहरांना जोडणारी कित्तुर मार्गे नवी रेल्वेलाईन व्हावी. अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे.Danve mos

त्यासंदर्भात भूसंपादन व इतर अनेक अडचणी असल्या तरी रेल्वे प्रशासन आणि वन विभाग यांच्यात समन्वय साधून भूसंपादन करावे. संबंधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.

मात्र ही रेल्वेलाईन जाहीर होऊन अनेक वर्षे झाली असली तरी त्या संदर्भातील प्रक्रियांना सुरुवात झाली नसल्याने आता खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.सांगली मिरजच्या खासदार, आमदारांनी पुणे-बेळगाव व बेळगाव-सांगली गाड्या सुरू होण्यासाठी रेल राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केल्यास लवकरच या दोन नविन गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.