Saturday, November 9, 2024

/

माध्यान्ह आहारातील ‘अंडी’ वादाच्या भोवऱ्यात?

 belgaum

एकीकडे पेजावर मठाधीशांसह शहरातील समस्त शाकाहारी नागरिक मंच बेळगावने शालेय मुलांच्या माध्यान्ह आहारामध्ये अंडी समाविष्ट करू नयेत, अशी मागणी केली जात असताना दुसरीकडे कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मीकी नोकर संघाने माध्यान्ह आहारातून कोणत्याही परिस्थितीत अंडी वगळली जाऊ नयेत, अशी मागणी केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह आहारासोबत अंडी देण्याची योजना कोणत्याही कारणाने मागे घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मीकी नोकर संघातर्फे काल गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नांवे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले.

कांही संघटनांकडून अंडी वितरणाला विरोध दर्शवला जात आहे. त्याची दखल घेऊन योजना मागे घेऊ नये आणि अंडी वितरण थांबून नये. मुलांच्या सुदृढ विकासासाठी ही योजना महत्त्वाची आहे. तंदुरुस्त आरोग्यासाठी बालकांना अंडी मिळाली पाहिजेत. सामाजिक आर्थिक दुर्बल मुलांना अंडी आणि अन्य आहार उपयुक्त ठरू शकेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.Mid day egg

यावेळी वाल्मिकी नोकर संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी हातात अंडी धरून आगळ्या पद्धतीने आपली मागणी काय आहे हे स्पष्ट केले.

निवेदन सादर करतेवेळी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी नोकर संघाचे राज्याध्यक्ष महेश शिगीहळ्ळी, शिवा नायक, परसू हणगी आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आहारातील अंडी समावेशाबाबत वरीलप्रमाणे मतभिन्नता आणि परस्पर विरोधी मागण्यांमुळे माध्यान्ह आहारातील ‘अंडी’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.