Tuesday, April 16, 2024

/

कवटगीमठ आणि लखनपैकी एकटाच जिंकणार : सतीश जारकीहोळी

 belgaum

विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि अपक्ष उमेदवाराहून अधिक मते घेऊन काँग्रेस उमेदवार विजयी  होईल असा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष  सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीत शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, मी आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस नगरसेवकांसह मतदान केले आहे. काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे हे आम्ही वरचेवर सांगत आहोत. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि अपक्ष अशी त्रिकोणी लढत होत आहे. भाजप आणि अपक्ष उमेदवाराहून अधिक पहिल्या पसंतीची मते घेऊन काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी विजयी होईल हे नक्की आहे.

लखन जारकीहोळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत का या प्रश्नावर, कदाचित असतीलही, परंतु ती ६ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ते आता कसे शक्य आहे? रमेश जारकीहोळी त्यांच्याबाजूने प्रचार करतात.

 belgaum

भाजपचे आमदार त्यांच्याबाजूने प्रचार करतात. लखनचा आमचा काहीही संबंध नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. अजून कवटगीमठ आणि लखन या दोघांपैकी एकजण जरूर निवडून येईल.कारण आमची स्पर्धा थेट आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच जिंकून येऊ असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

एकंदर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाही राजकीय पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहेत. यात कोण खऱ्या अर्थाने जिंकणार आणि कोण हरणार हे १४ डिसेंबरलाच कळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.