विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुळे भाजपला कोणता फटका बसणार की काय यासंदर्भात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र या चर्चा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शेट्टर यांनी आपल्या एका विधानाने थांबवल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाला अपक्ष उमेदवारामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. विधान परिषद निवडणुकीत १५ हुन अधिक जागांवर भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. अपक्ष उमेद्वारांमुळे भाजपाला कोणतेही नुकसान होणार नाही, धारवाड, गदग आणि हावेरीमध्ये भाजप उमेदवार प्रदीप शेट्टर यांचा प्रचंड बहुमतांनी विजय होईल, असा विश्वास जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.
धारवाड आणि गदग या भागातून प्रदीप शेट्टर यांना अधिकाधिक मते मिळतील.
या जिल्ह्यांमधून आमदारांनी अधिकाधिक मते जमा केली असून यादरम्यान भाजपाला अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला.
बेळगाव मध्ये ही अपक्ष उमेदवार मुळे कोणताही फटका बसणार नसल्याचे विधान जगदीश शेट्टर यांनी केले असल्याची माहिती मिळाली आहे.