Tuesday, June 25, 2024

/

काँग्रेसचा पराभव करणे हे आमचे ध्येय- रमेश जारकीहोळी

 belgaum

मी भाजपचा आमदार आहे. निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देणे हे माझे पहिले ध्येय नसून काँग्रेसचा पराभव करणे हे माझे ध्येय आहे.असे आज आमदार रमेश जारकिहोळी म्हणाले आहेत.

बेळगाव येथे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. मी भाजपचा आमदार असून भाजपला जिंकवणे हे माझे ध्येय नाही, काँग्रेसचा पराभव करणे हे ध्येय आहे. निकाल कळला की सगळं लक्षात येईलच. अशी गुगली त्यांनी टाकली.

निवडणुकीत जास्त पैसे वाटप होत असल्याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,निवडणुकीत पैसा हा एकमेव महत्त्वाचा मुद्दा नाही. लोकही चांगले वागताना दिसतातहेत.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यासाठी तयार आहोत. आधीच ते गुहेत बसले आहेत. काही कायदेशीर कृती असल्यास, त्यांना ते करू द्या.

 belgaum

आमदार सतीश जारकीहिली यांच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले, सतीश हतबल झाले आहेत. काँग्रेसची एक चतुर्थांश मतांवर घसरण होत आहे. मुख्यमंत्र्यांमुळे राज्यात चांगलेच वातावरण आहे. 2023 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल याबद्दल सतीश निराश झाले आहेत.असेही ते म्हणाले.

इतर सर्व पक्षीय नगरसेवकांना आपणच जिंकू असा विश्वास आहे. मतदान संपले असून विजयाची वाट पाहावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.