हलगा मच्छे बायपास प्रकरणी बेळगाव जिल्हा चतुर्थ दिवाणी न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आलेल्या कामाला खटला निकाली येई पर्यंत स्थगिती देण्याचा आदेश बजावल्या नंतर तुरळक काम सुरू असलेल्या मशिनी हलवल्या आहेत.
सोमवार पूर्वी न्यायालयाने मागील अनेकवेळा स्थगिती आदेश देऊन काम न करण्याचा आदेश देऊनही ठेकेदारने बायपासवर काम सुरू करत कामाला वापरण्यात येणाऱ्या मशीनी तिथेच ठेवल्या होत्या. सदर मशिनी महाराष्ट्र, झारखंड सह इतर ठिकाणाहून आणल्या होत्या रात्रंदिवस काम सुरु केल होत.पण स्थगिती मिळाल्यावर थोड्या मशीनी हलवल्या होत्या.
त्यातचं पाऊस पडल्याने काम बंद होते. पर राज्यातून आणलेल्या मशीनी व तेथील कामगार बायपासवरच आपली झोपडी बांधून मशीनीसह तिथेच ठाण मांडले होते तरीही आदेशाचे उल्लंघन करत रात्री छोटछोटे काम सुरुच होते.
सुरू असलेल्या कामाची फोटोसह माहिती,आक्षेपासह न्यायालयाच्या निदर्शनास शेतकऱ्यांच्या वकिलांनी आणून दिले होत त्यामुळे 6/12/2021 रोजी बेळगाव न्यायालयाने ठेकेदाराने आपले जे कामाचे अर्ज दाखल केले होते.
रद्द करुन झिरो पॉईंट निश्चित तसेच उर्वरित दाव्याचा निकाल लागेपर्यंत स्थगिती कायम असल्याचा आदेश न्यायालयाने बजावल्याने बायपासवर थांबलेल्या मशीनी व ठान मांडलेले कर्मचारी सोमवारी संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत हालवण्यात आले आहे.