Tuesday, January 7, 2025

/

युवकाकडून गावठी पिस्तूल, काडतुसे जप्त

 belgaum

नेसरी (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) येथील तारेवाडी गावाच्या हद्दीत वेताळमाळ या ठिकाणी नेसरी पोलिसांनी सापळा रचून बेळगावच्या एका युवकाला गावठी बनावटीच्या पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडून अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्दे मालाची किंमत 1 लाख 22 हजार 720 रुपये इतकी होते.

नितेश नागेश नेसरीकर (वय 24, रा. गणपत गल्ली, खादरवाडी, ता. जि. बेळगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नांव आहे. नितेश हा गावठी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती नेसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी वरील ठिकाणी सापळा रचून रितेशला अटक केली.

मोटर सायकलवरून (क्र. केए 22 एचएच 9046) येणाऱ्या नितेशला अडवून पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

तथापि मिळालेली टीप खात्रीशीर असल्याने आणि मिळालेली माहिती नितेशच्या चेहऱ्याशी मिळतीजुळती असल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे त्याच्या जवळ आढळून आली.

त्याची किंमत अंदाजे 1,22,720 रुपये इतकी होत असून पोलिसांनी इतर मुद्देमाल देखील जप्त केला. सदर आरोपीस ताब्यात घेऊन नेसरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.