Saturday, June 15, 2024

/

बायपास दारुड्यांसाठी मोकळे रान : कारवाईची मागणी

 belgaum

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाशी दोन हात करत हालगा-मच्छे बायपास रद्द करण्यासाठी शेतकरी प्रखर लढत देत असताना दुसरीकडे बायपाससाठी जबरदस्तीने करण्यात आलेले रस्त्याचे सपाटीकरण म्हणजे बेवड्यांना तसेच पार्ट्या करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. तेंव्हा पोलिसांनी याठिकाणी रंगणाऱ्या रात्रीच्या रंगीत पार्ट्यांना तात्काळ पायबंद घालून पार्ट्या करणाऱ्यांना चांगले चोपून अद्दल घडवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि येथील प्रशासनाशी दोन हात करत हालगा-मच्छे बायपास रद्द करण्यासाठी शेतकरी प्रखर लढा देत आहेत. आपली जेमतेम वडिलोपार्जित सांभाळलेली शेती वाचवण्यासाठी बँकेत कर्ज काढून न्यायमागणीसाठी दावा लढत आहेत. न्यायालयाने दिलेल्या न्यायाने त्यांची लढाऊ शक्ती फळास येत असतानांच ठेकेदारने पोलीसखात्याची मदत घेत युध्दपातळीवर पिकांत अक्षरशः बुलडोझर, जेसीबी घूसवून बायपाससाठी बेकायदेशीर सपाटीकरण केले. मात्र आता या सपाटीकरणाच्या स्वरूपात बेवड्यांना तसेच पार्ट्या करणाऱ्यांना रान मोकळे मिळाले आहे.

शेतकरी सायंकाळी काम आटपून घरी परतल्यानंतर रात्रीच्यावेळी या ठिकाणी राजरोसपणे दारु, बियर, ब्राऊन शुगर, गांजा त्याचबरोबर हॉटेलमधील जेवण किंवा त्याच ठिकाणी मटण, चिकण शिजवत पार्ट्या करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.Bypass

 belgaum

दारु पिऊन तर्र झाल्यावर बेवडे जशी काय त्यांच्या बापजाद्यांचीच जमीन आहे अस समजून किंवा जर त्यांच्यातच भांडण झाल्यास काचेच्या बाटल्या फोडून आपला राग दाखवत असतात. हे अनेक शेतकऱ्यांनी रात्री घरी येतानां पाहिल आहे. आता शेतकऱ्यांची भात कापणी, मळण्यांची भरपूर कामं सुरू आहेत. तथापी त्याकडे बेवडे दुर्लक्ष करत आपले काम अगदी बिनदिक्कत करत असतात. परिसरातील शेतकरीतर असे बेवडे, गांजा, जुगार खेळणाऱ्यामुळे वैतागले आहेत. गेल्यावर्षी 31 डिसेंबरच्या आधी रयत संघटनेतर्फे वडगाव ग्रामीण पोलिस ठाण्याला निवेदन देऊन बायपासवरील तसेच शेतात चालणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी केली होती. तसेच परिसरात पोलिस पोलीस गस्त सुरू करून दारु, पार्ट्या, जुगार, गांजा करणाऱ्यानां चोपून अद्दल घडवावी अशी विनंती केली होती. मात्र तशी कडक कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही.

सध्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कार्यतत्पर आहेत असे समजल्याने त्यांनी शेतकऱ्यांना दारुड्यांकडून होणारा नाहक त्रास थांबवून बायपास व शेतात चालणारे गैरप्रकार थांबवावेत, अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.