Tuesday, December 3, 2024

/

महाराष्ट्राने एकत्रितपणे सीमाभागाचा आधार बनले पाहिजे: एकनाथ शिंदे

 belgaum

सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्यंत हीन पद्धतीने अन्याय-अत्याचार सुरू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला जातो. या संदर्भात कर्नाटकाचे मुख्यमंत्री जे बोलतात ते विधान अतिशय दुर्दैवी आहे निषेध करण्यासाठी बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जातात.

या सार्‍या गंभीर प्रकारांची दखल महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घेतलेलि असून समस्त महाराष्ट्र सीमावासीयांच्या पाठीशी थांबलेला आहे. असे उद्गार सीमा समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत काढले.

महाराष्ट्र विधानसभेच्या मुंबई येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी,महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे सीमाभागातील मराठी भाषिक यांच्या पाठीशी राहणे ही आजची गरज आहे. कर्नाटकात मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना आम्ही ठामपणे त्यांना साथ देण्याची गरज आहे.असे मत मांडले.

या ठिकाणी अन्याय संदर्भात काही बोलायचे झाले तर ते योग्य होणार नाही. मात्र नाक दाबले की तोंड उघडते या उक्तीनुसार काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगदीच वेळ आली तर आम्हाला तसं वागावं लागेल आणि त्याला जबाबदार पूर्णपणे कर्नाटक सरकार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. सीमावासीय जनता आपल्या कडे आशेने पाहत आहे.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कालखंडापासून आपण सदैव त्यांच्या पाठीशी थांबलेलो आहोत. उद्धव ठाकरे यांनीही राज्याचा कारभार ताब्यात घेतल्यानंतर सर्वप्रथम सीमावासियांच्या संदर्भात योग्य त्या बैठका घेऊन पाठपुरावा सुरू केला आहे. छगन भुजबळ आणि आपण स्वतःला ते नेहमीच सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाच्या खटल्यात संदर्भात विचारणा करत असतात.

बेळगाव आणि एकंदर कर्नाटकात घडणाऱ्या सर्व घटनांची महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. छत्रपती शिवरायांचा अवमान होतो हे अतिशय हीन आणि गंभीर आहे.अश्या शब्दात त्यांनी एकंदर घटनांचा निषेध केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.