Tuesday, April 30, 2024

/

शाई फेकणाऱ्या वर गुन्हा दाखल : पोलीस आयुक्त

 belgaum

‘बेळगाव बंद’ सारख्या बेकायदेशीर प्रकारांना आमची परवानगी नाही. तथापी बेळगाव बंद बाबत समिती नेत्यांशी चर्चा करून तो मागे घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिली.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर महा मेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करून काळे फासण्याचा जो प्रकार घडला. त्याबाबत मैदानाच्या ठिकाणी पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. समितीच्या महामेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती, तरीही मेळावा घेण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. मेळाव्याच्या ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांशी गैरवर्तन करण्याबरोबरच बेकायदेशीररीत्या मेळावा घेणे, रस्त्यावर ठाण मांडणे आदी प्रकार केले जात आहेत. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

दळवी यांना काळे फासण्याचा जो निंद्य प्रकार घडला पोलीस घटनास्थळी असताना असा प्रकार कसा घडू शकतो? या प्रकाराची माहिती पोलीस गुप्तचर यंत्रणा कशी मिळाली नाही? शहरातील पोलीस गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली आहे. तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, असे तुम्हाला वाटत नाही का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना यासंदर्भात चौकशी करून निर्णय घेतला जाईल, असे पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी सांगितले.Tyagrajan

 belgaum

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या मंगळवारी बेळगाव बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता बेळगाव बंद सारख्या बेकायदेशीर प्रकारांना आमची परवानगी नाही. तथापि बंद बाबत समिती नेत्यांशी चर्चा करून बंद मागे घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव सह सीमाभागातील मराठी भाषिक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. मराठी भाषिकांनी आत्तापर्यंतचे आपले सर्व लढे कायदा व सुव्यवस्था भंग न करता यशस्वी केले आहेत. उद्याचा बेळगाव बंद हा अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा घटनेने दिलेला मराठी भाषिकांचा अधिकार आहे. त्यामुळे हा बंद बेकायदेशीर ठरविण्याचा प्रकार म्हणजे घटनेचा अवमान आणि एक प्रकारची दडपशाही असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.