Monday, November 25, 2024

/

स्टार कबड्डी लीगमध्ये चमकणार बेळगावचा ‘हा’ कबड्डीपटू

 belgaum

कैथाल -हरियाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमाला प्रारंभ होत असून या स्पर्धेमध्ये किणये बेळगावचा कृष्णा सुरेश पाटील हा हैदराबाद हंटर्स या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत पदार्पण करणारा कृष्णा पाटील हा बेळगावचा पहिलाच कबड्डीपटू आहे.

देशात प्रो -कबड्डी लीगचा आठवा मौसम आजपासून सुरू होत असताना येत्या 24 डिसेंबरपासून कैथाल -हरियाणा येथे राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमाला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 55 किलो वजनी गट विभागात चंदीगड चिताज, भोपाळ सूरमाज, झारखंड स्टार, दिल्ली डेसलर्स, हरियाणा पँथर्स, पुणे वॉरियर्स, हैदराबाद हंटर्स आणि चेन्नई सोरस हे 8 कबड्डी संघ एकमेकांविरुद्ध लढत देणार आहेत.

यापैकी हैदराबाद हंटर्स कबड्डी संघामध्ये किणये बेळगावच्या चेष्ट नं. 1835 असणाऱ्या कृष्णा सुरेश पाटील याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश आहे. या पद्धतीने राष्ट्रीय स्तरावर व्यवसायिक कबड्डीपटू म्हणून कृष्णा पाटील यांचे पदार्पण क्रीडानगरी बेळगावसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.Kabbadi

कबड्डीपटू कृष्णा पाटील हा हॉटेल व्यावसायिक असून त्याचे जांबोटी रोडवर हॉटेल आहे. लहानपणापासूनच खेळाची आवड असणारा कृष्णा गेल्या 13 वर्षापासून कबड्डी खेळत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह देशातील अन्य ठिकाणच्या कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. किणये येथील मराठा मंडळ हायस्कूल येथे त्याचेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले असून आरपीडी महाविद्यालयामध्ये तो पदवीपूर्व द्वितीय वर्षापर्यंत शिकला आहे. कबड्डी खेळात उत्कृष्ट रायडर होण्याबरोबरच तो अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो.

गोवा पोलीस दलातून त्याची हैदराबाद हंटर्स संघासाठी निवड झाली आहे. कृष्णा याला कबड्डी व्यतिरिक्त धावणे, हॉलीबॉल आणि फुटबॉल या क्रीडा प्रकारांमध्ये विशेष रस आहे. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या कृष्णा पाटील याची राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. कैथाल -हरियाणा येथे परवा 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या स्टार कबड्डी लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृष्णा पाटील आज सायंकाळी रवाना होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.