Tuesday, April 16, 2024

/

‘सीमा तपस्वीची दोन्हीही मुले ठरली तपस्वी’ एकत्र भोगताहेत कारावास’

 belgaum

एक मुलगा रणांगणात देशासाठी शहिद झाल्यानंतर त्याच्या प्रेतावर आई रडत रडत म्हणते , देवा मला आणखी एक सुपुत्र का दिला नाहीस तो देशासाठी अर्पण करता आला असता! ही कहाणी बरेचदा सांगितली जाते पण आज बेळगाव सीमावर्ती भागातील शेलारमामा म्हणून ओळखले जाणारे सीमातपस्वी रामा शिंदोळकर यांची दोन्ही मुले ‘शिवराय अपमान आंदोलन’ प्रकरणी कारागृहात गेली आहेत.ही कहाणी सांगण्याचा उद्देश म्हणजे मला आणखी एक मुलगा असता तरी त्याला लढायला धाडला असता असे म्हणणारा त्यांचा बाप आज प्रमुख जबाबदारी निभावत आहे

80 च्या घरात गेलेले आणि थकलेले रामा शिंदोळकर सीमा लढ्याची अखेर पहाण्यासाठी आसुसलेले आहेत.अनेक आंदोलनात स्वतः भाग घेणारे, आरोग्याच्या तक्रारी असताना सुद्धा आघाडीवर असणारे, ज्यांच्या कृतीतून सीमा लढ्याचा इतिहास उभा रहातो त्यांच्या नजरेत आजही आपल्या मुलांच्या विषयी अभिमान आहे.
सीमा लढा हीच मराठी माणसाची शौर्यगाथा आहे शिवाजी महाराज हेच त्यांचे स्फूर्ती स्थान आहे .आपल्या स्फूर्ती स्थानाला धक्का पोहोचेल त्याची अहवेलना होते हे कोणत्याही लढवय्या सैनिकाला न सहन होणारी गोष्ट आहे.थकलेल्या शिंदोळकरांच्या कडे बघून लोकांना वाटत असेल शिंदोळकरांची इच्छा शक्ती संपली पण अनेकदा मरण दाराला ठोकून परत आलेले शिंदोळकर खिंडीतील बाजी प्रभू आहेत.Balwant

त्यांचे दोन्ही चिरंजीव सूरज आणि बळवंत हे सध्या हिंडलगा कारागृहात आहेत.छत्रपती शिवाजी महाराज अवमान विरोधातील आंदोलनात न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या शिंदोळकर यांच्या घरात करता पुरुष कोणीही नाही. दोन्ही मुलगे जेल मध्ये गेलेत त्यांची जामिनावर सुटका होईपर्यंत ही घरची लढाई एकट्या रामा यांनाच लढायची आहे.

 belgaum

सध्या शिवराय अवमान विरोधी आंदोलनात कोनवाळ गल्लीतील एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ कारागृहात असल्याने त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर इतर जबाबदारी वाढली आहे. मात्र रामा शिंदोळकर सारखे लढवय्ये अश्या अनेक संकटावर मात करून लढ्यात सहभागी आहेत अश्या लढवय्या कुटुंबाला आमचा सलाम…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.