बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यापैकी तिघाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती हाती आली आहे .या प्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती कर्नाटक पोलीस मुख्यालयांने दिले आहे .
बेंगलोर मधील सदाशिवनगर पोलीस स्थानकात ही कारवाई केली आहे .17 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती .
या प्रकरणी तपासाला गती देऊन संबंधितांची ओळख पटविण्याचे काम जोरात सुरू होते .छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर सीमावर्ती भागामध्ये प्रचंड उद्रेक झाला. हजारो नागरिक रस्त्यावर आले त्यामुळे 144 कलम लागू करण्याची वेळ कर्नाटक सरकारवर आली.
कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू असताना निर्माण झालेला प्रकार अतिशय घातक ठरला आहे .यामुळे सरकारच्या हिवाळी अधिवेशनावर ही अपयशाचे गालबोट लागले असून त्यामुळे कर्नाटक सरकार आता जोरदार कामाला लागले आहे .
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राष्ट्रपुरुषांच्या अवमान प्रकरणी त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाणार आहे हे यापुढे स्पष्ट होणार आहे.