मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी आनंदवाडी कुस्ती आखाडामध्ये कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
सदर कुस्ती मैदानामध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या दहा क्रमांकाच्या कुस्त्या पुढील प्रमाणे आहेत. 1) नागराज बसनोडी कर्नाटक केसरी विरुद्ध संतोष पडोळकर महाराष्ट्र चॅम्पियन, 2) आकाश घाडी एमईजी सेंटर बेंगलोर वि. सौरभ पाटील तालीम राशिवडे इंटरनॅशनल चॅम्पियन,
3) पवन चिकदिनकोप तालीम भांदूर गल्ली बेळगाव वि. किर्तिकुमार बेनके तालीम लहान कंग्राळी, 4) रोहित पाटील तालीम लहान कंग्राळी वि. सिद्धारूढ धारवाड तालीम, 5) किरण अष्टगी कलखांब वि. संतोष गावडे तालीम पुणे, 6) राजू गंदीगवाड तालीम भांदूर गल्ली बेळगाव वि. विक्रम गावडे तालीम तुर्केवाडी, 7) हणमंत गंदीगवाड तालीम भांदूर गल्ली बेळगाव विरुद्ध वासू शिरतोडे तालीम राशिवडे,
8) गुरुलिंग मुधोळ एमईजी सेंटर बेंगलोर वि. दर्शन लहान कंग्राळी, 9) लक्ष्मण मुनोळी एमईजी बेंगलोर विरुद्ध मंजू धारवाड तालीम भांदूर गल्ली बेळगाव, 10) श्री घाडी बेळगाव विरुद्ध ओम काईधोडे तालीम राशिवडे.
सदर पहिल्या दहा क्रमांकाच्या कुस्त्यांसह येत्या 9 जानेवारी रोजी होणाऱ्या जंगी कुस्ती मैदानात लहान-मोठ्या 50 हून अधिक कुस्त्या खेळल्या जाणार आहेत, असे मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावचे अध्यक्ष पै. मारुती घाडी यांनी कळविले आहे.