ज्या पक्षाने बेळगाव मनपावरील भगवा काढला तो पक्ष मी सोडला असे सांगत माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी संघर्षाचा नारा दिला.मनपा निवडणुकीत आमचा पराभव झाला नसून कटकारस्थान करून आम्हाला हरवण्यात आले आहे असा घाणाघाती आरोप त्यांनी केला.
पाटील गल्ली वडगांव येथील अनुसया मंगल कार्यालयात वडगांव कृषी पत्तीनं सहकारी संघाच्या वतीने शेतकऱ्यांना सव्वा कोटी रुपयांचे कर्ज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य राजू अंकलगी, भाजप नेते किरण जाधव, जेष्ठ नागरिक प्रभाकर कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर, वडगांव कृषी पत्तीनंचे अमोल देसाई आदी उपस्थित होते.
बेळगाव तालुक्यात मराठी समाज विस्कळीत झाल्यानेच शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार सुरू आहेत.सर्रास सगळीकडे अन्याय होत आहे यावर आवाज उठवण्यासाठी सर्वप्रथम आम्ही संघटित होणे गरजेचे आहे मराठा समाजाच्या एकत्रिकरणासाठी माझा पुढाकार आहे. मी भाजप सोडली असून इथून पुढे मराठा समाज एकत्रिकरण करणार असल्याचे त्यांनी नमूद केलं
यावेळी पत संस्थचे अध्यक्ष अमोल देसाई यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेत डी सी सी बँकेचे सदस्य राजू अंकलगी यांच्यामुळेच वडगांव भागातील शेतकऱ्यांना संस्थेने मदत केली इतकी मोठी मजल मारली असल्याने सांगितलं. भविष्यात पाच कोटी कर्ज शेतकऱ्यांना देऊ असे काम करून दाखवू असे म्हटले.
भाजप नेते किरण जाधव यांनी वडगांव भागांतील शेतकऱ्यांना वडगांव कृषी पत्तीनं संस्था वरदान ठरली असून शेतकऱ्यांना बळकटी देण्याचे आवाहन सरकारने करणे गरजेचे आहे जिल्ह्यातील इतर तालुक्याना पन्नास कोटीहून अधिक कर्ज दिले गेलं आहे मात्र बेळगाव तालुक्याला त्या तुलनेत कमी कर्ज दिले गेले आहे यावर अभ्यास करणे गरजेचे आहे याबाबत शेतकऱ्यांत जनजागृती करणे जरुरी आहे असे म्हटले.
तर डी सी सी बँक संचालक राजू अंकलगी यांनी भविष्यात देखील यासंस्थेला शासकीय मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन दिले. या भागातील माजी नगरसेवक जेष्ठ पंच शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.