belgaum

प्रत्येकाच्या मनात स्वतःचा ताजमहल असतो,आणि स्वतःची एक मुमताज असते. पत्नी विरह हा राजा पासून रंका पर्यन्त सगळ्यांना सारखाच असतो. कुणाचे हुंदके दिसतात कुणाचे दिसत नाहीत.जीवन वेदीवर साथीने चाललेली पाऊल जोडी दाराला विसरता येत नाहीत.

कोण मूक पणाने अश्रू ढाळत रहातात तर कोण झुरत राहतं, काळजाला झालेल्या वेदना त्याला आतल्या आत झुरणी लावत असतात, मग प्रत्येक जण शोधतो एक मार्ग आपल्या सह चरणीच्या आठवणीत रमण्याचा..कोण तिच्या नावाने वास्तू उभा करतो कोण देणगी देतो कोण शाळा काढतो तर झाडे लावतो..कोण सामाजिक कार्यात आपल्याला झोकून देतो.

प्रत्येकाचा मार्ग वेगळा असला तरी ध्येय एकच असते…’तेरी याद में’… बेळगावात माजी नगरसेविका मैनाबाई चौगुले या अकाली शिवाजी रावांचं घरटे सोडून निघून गेल्या आणि मनाने जखमी झालेल्या शिवा याना स्वतःचा एकांत सतावू लागला, घरट.. उदास झालं प्रत्येक क्षण त्यांना एकांतात भेडसाऊ लागला. आपल्या पत्नीचे नसणे त्यांचं मन मान्य करायला तयार नव्हतं, शिवाजी राव दररोज आपल्याच विचारात होते आपली जोडीदारीन आपल्या सोबत असायलाचं पाहिजे आणि त्यांनी अक्षरशः आपल्या पत्नीची मूर्तीचं करून आणली आणि घरट्यातल चैतन्य परत आलं.

शिवा चौगुले सामाजिक कार्यकर्ते शिवबसव नगर मरगाई नगर भागात रहातात त्यांच्या पत्नी मैनाबाई चौगुले यांचे गेल्या काही महिन्यांपूर्वी आजाराने निधन झालं होतं.शिवा चौगुले यांना पत्नी वियोग सहन होत नव्हता, एक सारखे आठवण यायची म्हणून त्यांनी या दिवाळीच्या निमित्ताने वाजत गाजत मिरवणूक काढत मैनाबाई चौगुले यांचा पुतळा घरी आणून बसवला आहे.Shiva chougule

घरात पत्नीचा पुतळा बसवताना त्यांनी इथून पुढचं आयुष्य समाजसेवेसाठी झोकून देण्याचा निर्णय घेतलाय सौ. मैनाबाई फौंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत करून एक हॉस्पिटल बनवण्याचा मानस शिवा चौगुले यांनी बोलून दाखवला आहे.

क्षणात काडीमोड घेणाऱ्या,नव्या पिढीला दीर्घकाळ साथी सोबती राहिल्या नंतर काळाने जोडीदार घेऊन गेल्यानंतर आपली जोडीदारीन आपल्या सोबत असावी ही घटना डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

ज्यावेळी फॅमिली कोर्ट मधील वाद विवाद अश्या घटना दाखवल्या तर कमी होतील असाही आशावाद जाणत्या कडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.