कर्नाटक उच्च न्यायालयाने विकासकामे राबवण्यास स्थगिती दिलेली असतानाही रात्रीच्या वेळी व्हॅक्सिन डेपोमध्ये चोरून कामे करत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे .
या प्रकरणी पर्यावरणीनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती दिली आहे.
व्हॅक्सिन डेपो मध्ये कोणत्याही प्रकारचे काम केले जाऊ नये, असा आदेश देऊन राबविल्या जात असलेल्या कामांवर स्थगिती देण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता.
त्या वेळी सप्टेंबरमध्ये व्हॅक्सिन डेपो परिसरात 93 हजार झाडे लावू असे सांगून काही अंशी परवानगी घेण्यात आली होती. दरम्यान अद्याप एकही झाड लावलेले नसून विकास कामे करण्यासंदर्भात रात्री उशिरा काम केले जात असल्यामुळे तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे .
याप्रकरणी न्यायालयाने योग्य तो आदेश द्यावा ,कोणत्याही प्रकारे पर्यावरणीय नियमांचा भंग होऊ नये. बेळगावचे ऑक्सिजन ठरलेल्या व्हॅक्सिन डेपो मध्ये कोणत्याही प्रकारे रात्रीच्या वेळी कामे केली जाऊ नयेत. अशी मागणी पर्यावरणी करत आहेत.