कापलेल्या भातालाच आले कोंब : आधीच खचला शेतकरी
गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शेतात कापून ठेवलेली भातपीकं पाण्यात राहून ठेवलेल्या ठिकाणीच पुन्हा कोंब फुटून ती हिरवी होऊ लागल्याने हातातोंडाला आलेला घास नियतिने हिरावून घेतल्याने शेतकरी आधीच खचला आहे. तसेच कोसळलेल्या आस्मानी संकटामुळे पुढचे दिवस कसे ढकलावेत याच विवंचनेत पडला आहे.
बेळगाव शहर परिसरासह तालुक्यात भातपेरणी झाली. मात्र मोठ्या पावसाच्या पुराने दोनदा पेरलेले भात वाया गेले आणि तिसऱ्यांदा भात रोप विकत घेऊन अनेक शेतकऱ्यांनी लावणी केली. त्यासाठी एकरी 40 हजार रुपये खर्च यात भर म्हणून आधी पेरणी केलेला वेगळा खर्च आणि ऐवढ खर्च करूनही शेतकरी घाबरला नाही. तथापी आता भातपीकांचे असे नुकसान पाहुन त्याच्यासकट घरच्या महिलांच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहिले नाही. कारण भिजलेले भात कांहीच कामाला येत नाही. ना विकायला, ना खायला. जर वाळवून गिरणीत घातलं तर ते सर्व पीठच होते. ते वापरायचच असेल तर भरडून आपली जनावरं असतील तर चालतं, परंतू ज्यांची जनावरं नाहीत त्यांच भात वायाच जातं. यामूळे यावर्षी गंजीतील भातची उगवण सुरु आहे. त्या पुढार रब्बी पेरलेल्यांचे जमीनीच्या वर 2 -3 इंच पीकं आले असले तरी त्यातही पाणी भरुन तेही कुजून जात आहेत. अद्याप 75 टक्के भात कापणी व्हावयाची आहे. तथापी पावसाच हे रोजचं रडगाण सुरूच असल्यामुळे भातपीकंही झडून जातात किंवा लोबांतूनच उगवण सुरु होते. म्हणजे येनकेन प्रकारे शेतकरी संपलाच. त्याचप्रमाणे इतर पीकंही वायाच गेल्याने संपूर्ण कोरोना काळात देशाची जिडिपी राखून ठेवलेल्या शेतकऱ्याला कोरोना संपल्यावर मात्र नियतीने संपवलय आहे. त्यासाठी देशातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने सरसकट प्रत्येकाच्या बांधावर जाऊन भरीव अशी मदत करत त्याला जगण्याच बळ प्राप्त करुन देत सक्षम बनवाव अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तेंव्हा विकासासाठीचे लाखो कोटी थांबवून यावेळी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केल्यास देशातील शेतकरी नक्कीच देशाला सावरेल यात तिळमात्र शंका नाही. पण शेतकऱ्यांबद्दल तेवढी आत्मियता आणि तळमळ असेल तर सरकार नक्कीच शेतकऱ्यांना तारेल अन्यथा देशात अन्नधान्याचा तुटवडा पडल्याशिवाय रहाणार नाही. अन्नधान्य कारखान्यातून तयार होत नसतं ते जमीनीतूनच उगवाव लागत हे सरकारने जाणिवपूर्वक लक्षात ठेवल्यास प्रत्येक शेतकऱ्यांना समाधान वाटेल.