देवपूजेचे साहित्य विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तीन बहिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. एकटी सुदैवाने बचावली असून सांबरा येथे घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास महादेव तलावात ही घटना घडली.नेत्रा कोळवी वय 8 प्रिया कोळवी वय 6 दोघीही बहिणी असे या घटनेत मयत झालेल्या दोन्ही चिमुरडींची नावे आहेत. तर संध्या कोळवी वय 10 वर्षे मोठ्या बहिणीला वाचवण्यात आले आहे.
घटनेची माहिती कळताच गावातील ग्राम पंचायत सदस्य भुजंग गिरमल आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी तलावात उडी टाकून सदर मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र केवळ एका मुलीला वाचवण्यात यश आले उर्वरित दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मूळचे गोकाक जवळील येद्दलगुडचे इरान्ना कोळवी हे भारतीय सैन्यदलात सेवा बजावतात सांबरा येथे भाड्याच्या घरात रहातात.गेल्या आठ दिवसांपूर्वी इरान्ना हे कारवारला सैन्यदलात सेवेत सुट्टी संपवून रुजू झाले होते तर मयत मुलींची आई कोन्नूरला माहेरी गेली होती रविवारी दुपारी परतली होती त्यानंतर ही घटना घडली आहे.
मोठी बहीण वाचली
दुपारी तीनच्या सुमारास तलावात तिघी बहिणी बुडल्याचे कळताच ग्राम पंचायत सदस्य भुजंग गिरमल आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी पाण्यात उडी घेत तिघींना बाहेर काढले घटनास्थळी एकटीचा मृत्यू झाला होता तर उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.