Saturday, July 27, 2024

/

केपीसीसी कडे या तिघांच्या नावाची शिफारस

 belgaum

कर्नाटकात महत्वाच्या विधान परिषद निवडणुकीचेवारे आता वाहू लागले आहेत. विधान परिषद निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही तरीही बेळगाव विधानसभेतून काँग्रेस पक्षातील अनेक इच्छुकांनी केपीसीसी कडे अर्ज केले आहेत. भाजपने देखील या निवडणुकीची तयारी केली आहे

बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस कडून अनेकांनी अर्ज केले जाते मात्र काँग्रेसने तिघांची नावे बंगळुरूला पाठवली आहेत.

बेळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने ग्रामीण आमदारांचे भाऊ चन्नराज हट्टीहोळी, किरण साधुन्नावर आणि  गोवा काँग्रेस प्रभारी सुनील हनमन्नावर यांच्या नावाची शिफारस केली आहे.

चन्नराजा हट्टीहोळी यांनी आतापासूनच बेळगाव ग्रामीण मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांना दिवाळी शुभेच्छापत्रे पोस्ट करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.