Monday, April 29, 2024

/

सिद्धरामय्या : हनगलचा पराभव हा मुख्यमंत्री बोम्मई यांचा पराभव

 belgaum

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हनगल विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव हा खरे तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पराभव आहे,असे म्हटले आहे. कारण हा मतदारसंघ त्यांच्या मूळ मतदारसंघात येतो.

30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत, मतमोजणी झाली, त्यात भाजपचे रमेश भुसनूर यांनी सिंदगीच्या जागेवर विजय मिळवला तर मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातील हावेरी येथील हनगल येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास माने यांनी भाजपच्या शिवराज सज्जनार यांचा पराभव करत निवडणूक जिंकली.

ट्विटच्या एका सेटमध्ये काँग्रेसच्या दिग्गजांनी भाजपवर निशाणा साधला. “हनगल निवडणुकीत भाजपचे खरे उमेदवार हे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई होते. त्यांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा पराभव झाला. ‘मी या मातीचा मुलगा आहे’, अशा भावनिक भाषणानंतरही जनतेने त्यांना नाकारले आहे. मी इथेच मरेन’ आणि ‘मी या भागाचा जावई आहे’, असे सिद्धरामय्या यांनी ट्विट केले आहे.

 belgaum

निवडणुकीचा निकाल सत्ताधारी भाजपविरोधातील लाट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सिंदगी निकालाबाबत सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेस पक्षाने तिसर्‍या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर येत सुधारणा केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे उमेदवार अशोक मानगुली यांना 40,000 मते मिळाली.हे ही नसे थोडके.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.