एका नेत्यामुळे बेळगावात काँग्रेसची वाढ झाली नाही त्यामुळे शहरात काँग्रेस बळकट करण्यासाठी मी स्वता सुरुवात केली आहे असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्या नंतर चर्चाना उधाण आले असून तो कॉंग्रेस नेता कोण यांचीही चर्चा सुरू झाली आहे.
स्वतःच्या फेसबुक पेजवर त्यांनी याबाबत भाष्य केले असून लोकसभा पोटनिवडणुक आणि मनपा निवडणुकीतील अपयशाला देखील त्यांनी एका काँग्रेस नेत्याला जबाबदार धरले असून त्या मुलाखातीत त्याच नाव घेण मात्र टाळलं आहे.
काँग्रेस वाढीसाठी जबाबदार नेता कोण असेल ? याची सतीश जारकीहोळी यांच्या वक्तव्या वरून राजकीय विश्लेषक आणि जाणकारांना कल्पना आली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या गोटात याची जोरदारपणे रंगू लागली आहे.
काँग्रेसच्या ‘त्या’ नेत्याने मनपा आणि लोकसभा पोट निवडणुकीत काम केले नाही त्याचा फटका पक्षाला बसलाय त्यामुळे आपण स्वता बेळगाव शहरात पक्ष संघटना बळकट करू असे जारकीहोळी यांनी म्हटले आहे. मागील महिना अगोदर पासून सतीश जारकीहोळी हे बेळगाव दक्षिण मतदारसंघात भलतेच सक्रिय झाल्याचे समोर आले होते त्यानंतर काल त्यांनी स्वताच आपण शहरांत पक्ष संघटना बळकट करणार असल्याचे म्हटले आहे.
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी त्या पक्षासाठी काम न करणाऱ्या काँग्रेस नेत्याचे नाव जरी घेतले नसले तरी त्यांचा रोख माजी लोकप्रतिनिधीकडे असावा अशी चर्चा राजकीय गोटात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात सतीश यांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे जर कुणाचीही वर्णी लावण्यासाठी किंवा पत्ता कट करण्यासाठी देखील त्यांचाच रोल असणार आहे याचीही चर्चा आहे
जर का सतीश यांनी शहराच्या दोन्ही मतदारसंघात लक्ष घातले तर सक्षम विरोधी पक्ष म्हणून वर्षभर चांगलं काम केलं तर बेळगावात काँग्रेसचे अच्छे दिन येऊ शकतात यातमात्र शंका नाही