शहरातील खानापूर रोड, टिळकवाडी येथील आकाश इन्स्टिट्यूट या संस्थेच्या रोशनी तीर्थळ्ळी हिने प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेमध्ये (नीट युजी -2021) देशात 103 वा क्रमांक मिळविताना स्वतःसह आपले आई-वडील आणि संस्थेचे नांव उज्ज्वल केले आहे.
नीट यूजी -2021 परीक्षेचा निकाल आज मंगळवारी घोषित झाला असून नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत रोशनी तीर्थळ्ळी 720 पैकी 705 गुण संपादन केले आहेत. रोशनीने आकाश इन्स्टिट्यूटमध्ये दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि अथक परिश्रमाने नीट परीक्षेत हे यश मिळवले. आकाश संस्थेमधील अध्ययन पद्धतीबद्दल मी कृतज्ञ आहे आहे. अल्पावधीत एवढ्या सगळ्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे आकाशमुळेच शक्य झाले असेही ती आपल्या सत्कारप्रसंगी बोलताना म्हणाली.
रोशनी तीर्थळ्ळी हिच्या यशाबद्दल आकाश इन्स्टिट्यूटतर्फे आज तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना रोशनीच्या यशाचे कौतुक करून आकाश इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आकाश चौधरी म्हणाले, रोशनीने नीटच्या परीक्षेत देशपातळीवर हे उल्लेखनीय यश मिळवले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परिश्रम आणि निष्ठा त्या गुणांच्या जोरावर तिने हे यश मिळवले असून तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. कोरोना काळात शिक्षण पद्धतीत बदल झाला आम्ही स्वतः मध्ये बदल करून विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण दिले. परंतु कोठेही त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. व्हर्च्युअल पद्धतीने आम्ही अनेक परीक्षा आणि चांचण्या घेतल्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून आमचे परिश्रम सार्थकी लावले. दरवर्षी वैद्यकीय दंत वैद्यकीय आयुष शाखांच्या अभ्यासक्रमासाठी नीट परीक्षा घेतली जाते. यासाठीची संपूर्ण तयारी आकाश संस्था करून घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्कार समारंभास आकाश इन्स्टिट्यूटचे उपसंचालक पुष्कर मिश्रा, शाखाप्रमुख डॉ. जया श्रीवास्तव, कलंदर आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनी पालक आणि हितचिंतक उपस्थित होते. आकाश इन्स्टिट्यूट विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सुद्धा करून घेते. गेल्या 33 वर्षापासून आकाश इन्स्टिट्यूट कार्यरत असून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम निवडण्यासाठी तसेच अनेक शिष्यवृत्तीसाठी आकाश संस्थेने विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली आहे. आकाश ग्रुपमध्ये थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड (बायजूस) आणि ब्लॅकस्टोन या जगातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट इक्विटी फार्मची गुंतवणूक आहे.