एम एल आय आर सी ची विशेष भरती मोहिम-डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्ससाठी विशेष भरती मोहीम बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमएलआयआरसी) येथे 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी आयोजित केली जात आहे.
सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लर्क या पदांसाठी भरती होणार आहे. ज्यांनी मराठा मध्ये किमान पाच वर्षे सेवा केली आहे ते या भरतीसाठी पात्र आहेत.
सोल्जर जनरल ड्युटीसाठी वयोमर्यादा ४६ आणि सोल्जर क्लर्कसाठी ४८ आहे. भरतीला येताना उमेदवारांनी संबंधित प्रमाणपत्रे आणावीत.असे आवाहन करण्यात आले आहे.