Tuesday, April 30, 2024

/

विजनवासात गेलेले रमेश कुडची पुन्हा सक्रिय!

 belgaum

राजकीय विजनवासात गेलेले बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी नुकतीच जिल्हा काँग्रेस कार्यालयात केपीसीसी कार्याध्यक्ष व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली.

शहरातील काँग्रेस भवनामध्ये माजी आमदार रमेश कुडची यांनी काल गुरुवारी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली, त्यावेळी कुडची आमदार असताना त्यांच्यासोबत काम केलेले पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील आठवड्यात आमदार जारकीहोळींनी महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवासाठी एका नेत्याला जबाबदार ठरले होते. नांव न घेता त्यांनी माजी आमदार फिरोज सेठ व त्यांचे बंधू शहर जिल्हाध्यक्ष राजू शेठ यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे अंतर्गत घडामोडी वाढण्याची चर्चा होती.

 belgaum

आठवड्यातच माजी आमदार रमेश कुडची सक्रिय झाल्याने त्याला पुष्टी मिळाली आहे. कुडचींना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी विधानपरिषद व 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.Ramesh kudachi cogress

रमेश कुडची हे 2009 नंतर राजकीय विजनवासात गेले होते. आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ते पक्षात पुन्हा सक्रिय झाले आहेत. सेठ बंधूंना शह देण्यासाठीच त्यांना पुढे आणले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. म. ए. समितीकडून रमेश कुडची बेळगावचे महापौर झाले. मात्र 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून बेळगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यावेळी पहिल्यांदाच बेळगावात समितीचा पराभव झाला आणि त्याची राज्यात चर्चा झाली. त्यानंतर 2004 मधील निवडणुकीत ते पुन्हा कॉंग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले होते. 2004 ते 2008 या काळात काँग्रेसमधील काहींनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली.

बेळगाव उत्तर मतदार संघाची 2008 मध्ये निर्मिती झाली त्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती. परंतु पक्षाने फिरोज सेठ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कुडची यांनी निजदकडून निवडणूक लढविली. परंतु त्यांचा पराभव झाला 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार सुरेश अंगडी यांचा प्रचार केला. त्यामुळे ते काँग्रेसपासून दुरावले होते. आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.