डी के शिवकुमार यांनी केलेल्या आरोपांना मी आता काहीच उत्तर देणार नाही.14 डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणुकीचा जो निकाला दिवशीच योग्य प्रत्युत्तर दिले जाईल असे स्पष्टीकरण गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केलं आहे.
भाजप हाय कमांडच्या भेटीला गेलेले माजी मंत्री जारकीहोळी यांनी दूरध्वनी मार्फत बोलताना ‘या विषयावर मी आता काहीच बोलणार नाही’ निवडणूक निकाला नंतर याला योग्य उत्तर देऊ असे ते म्हणाले.
डी के शिवकुमार काहीही बोलू देत निवडणूक जवळ आली आहे भाजप उमेदवाराला जिंकवणे आमचे ध्येय आहे.निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे नको त्या आरोपांना निकालांने उत्तर देऊ असे त्यांनी नमुद केलंय.
जिल्ह्यात भाजपला विजयी करा याबाबत आम्ही लोकनियुक्त सदस्यांना भेटून विनंती केली आहे.ग्राम पंचायत,नगर पंचायत आणि महापालिकातून भाजपचे सदस्य अधिक असल्याने भाजपचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.