Monday, November 18, 2024

/

या भागात पावसाची शक्यता

 belgaum

बेंगळुरू, बेळगाव आणि कर्नाटकच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे- बंगळुरू मध्ये शुक्रवार, 5 नोव्हेंबर ते शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गडगडाटी वादळासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

आणि सोमवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल. दरम्यान, दक्षिण कन्नड, उडुपी आणि उत्तरा कर्नाटक सह किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये शुक्रवार आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात वादळे होतील.

रविवार ते मंगळवारपर्यंत किनारपट्टीवर अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
कलबुर्गी आणि यादगीर वगळता कर्नाटकच्या अंतर्गत भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये शनिवारी पाऊस पडेल. रविवार ते मंगळवार, बेळगाव, धारवाड आणि हावेरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, इतर जिल्हे बहुतांश कोरडे राहतील.Rainfall cloudy

कर्नाटकच्या अंतर्गत भागातील जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता होती आणि काही भागात ती खरी ठरली. शनिवार ते सोमवारपर्यंतही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पाऊस अपेक्षित आहे.

पश्चिम घाटात असलेल्या चिक्कमंगळूर, हसन, कोडगु आणि शिवमोग्गासह अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चामराजनगर, मंड्या आणि म्हैसूरमध्ये शनीवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.