Friday, December 20, 2024

/

ओमिक्रॉन- कोरोनाचा नवीन व्हेरियंट आणि घसा बसणे

 belgaum

कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन – Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने ‘Variant of Concern’ म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे.

या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय “भयावह” विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं आहे. तर राज्य कोरोना टास्क फोर्ससुद्धा याबाबत सतर्क झाला आहे.जागतिक आरोग्यसंघटनेनं या व्हेरियंटला – व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हटल्याने आता जगभरातले देश या विषाणूसाठीचा जीनोम सिक्वेन्स एकमेकांसोबत शेअर करतील, जगभरात कुठेही या सुरुवातीच्या काळात आढळणारे ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वा क्लस्टर्स – म्हणजे एकाच वेळी, एका भागात अनेक रुग्ण सापडले तर त्याची माहिती WHO ला देण्यात येईल. आणि या भागात तपासण्या आणि संशोधन करण्यात येईल.

युके, अमेरिका, कॅनडासह अनेक देशांनी आता आफ्रिकेतल्या देशांमधून येणाऱ्या फ्लाईट्स बंद करण्याचं ठरवलं आहे.
हा नवा विषाणू किती वेगानं पसरतो? त्याची क्षमता आणि लसीपासून मिळालेल्या संरक्षणाला बायपास करण्याची त्याची क्षमता किती आहे? आणि यावर तातडीने काय उपाय करावे? असे प्रश्न सध्या आहेत.

याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण त्याबाबत अत्यंत मोजकी अशी स्पष्ट माहिती आहे.कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. व्हायरसच्या इतर व्हेरियंटना देण्यात आलेल्या अल्फा आणि डेल्टा अशा ग्रीक नावांप्रमाणे या व्हेरियंटला Omicron – ओमिक्रॉन नाव देण्यात आलंय.Omicron

या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल – म्युटेशन्स झाल्याचं आढळलं आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय.

“या नव्या प्रकारच्या विषाणूनं आम्हाला आश्चर्यचकित केलं. बदलांचा विचार करता यानं मोठी उडी घेतली आहे. आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक म्युटेशन झालं आहे,” असं ते म्हणाले.
याबाबत माध्यमांना माहिती देताना ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय, या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळलेत. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.

आता समोर आलेली चिंतेची बाब म्हणजे हा नवा विषाणू वुहान आणि चीनमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूच्या तुलनेत प्रचंड वेगळा आहे. म्हणजे, या विषाणूच्या स्ट्रेनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या लशी फारशा प्रभावी ठरू शकणार नाहीत.
काही म्युटेशन हे आधीच्या इतर काही प्रकारच्या विषाणूंमध्ये आढळलेले आहेत. त्यावरून या विषाणूतील त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत माहिती मिळते.

उदाहरण सांगायचं झाल्यास, N501Y यामुळं कोरोना विषाणूचा प्रसार हा आणखी सहजपणे होताना दिसतो. यापैकी काही विषाणूमुळं शरिरातील अँटिबॉडीला नेमका विषाणू ओळखणं कठिण ठरत असल्यानं त्यांचा प्रभाव कमी होतो. पण इतर काही पूर्णपणे नवीनही आहेत.Dr sonali sarnobat

घसा बसणे

घसा बसणे
बोलताना किंचित घोगरा आणि कर्कश आवाज येत असल्यास ’घसा बसणे’ असे म्हटले जाते. साध्या सर्दीपासून ते अगदी घशाच्या कॅन्सरमुळे घसा बसू शकतो. त्यामुळे हा विकार म्हणाल तर अगदी साधा अन्यथा अतिभयंकर ठरू शकतो. घसा बसतो म्हणजे नेमकं काय होतं?
* स्वरयंत्राच्या तारांच्या हालचाली बिघडतात किंवा
* स्वरयंत्राच्या तारा एकमेकाला चिकटतात किंवा
* स्वरयंत्रावर मांस वाढते किंवा
* स्वरयंत्राच्या तारांवर जास्त ताण पडतो.
कारणे-
* जन्मजात स्वरयंत्रावर गाठ असणे.
* वेडेवाकडे आवाज काढून बोलणे किंवा सतत कर्कश ओरडणे, भसाड्या आवाजात गाणी म्हणणे किंवा अति खोकणे, यामुळे स्वरयंत्रावर ताण येतो.
* गळ्यावर बाहेरून झालेले आघात उदा. दोरीने गळा आवळल्यावर किंवा तत्सम प्रकारच्या दाबामुळे स्वरयंत्रात रक्तस्त्राव झाल्यास आवाज बिघडतो.
* काही जिवाणू- विषाणूमुळे होणार्‍या (इन्फेक्शन) संसर्गामुळे घसा बसतो.
* अति बोलणार्‍या किंवा गाणार्‍या व्यक्तींच्या घशात एका विशिष्ट प्रकारची गाठ येऊन घसा बसू शकतो.
* अ‍ॅलर्जीमुळे घशाला सूज येऊनही बोलता येत नाही.
* स्वरयंत्राची हालचाल नियंत्रित करणारी नस निकामी झाल्यामुळे कायमचा आवाज बसतो.
* घशाचा कॅन्सर हे देखील घसा बसण्याचे महत्वाचे कारण आहे.
* थॉयरॉईड विकार, काही विशिष्ट (हृदयाचे व मूत्रपिंडाचे) विकार यामुळेही आवाज बदलतो.

* मधुमेह, शेंदूर प्रयोगामुळे (लेड पॉइझन) नस निकामी होते.
*मानसिक तणावामुळेही कित्येकदा विशेषतः स्त्रियांमध्ये घसा बसण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
उपचार- कारणपरत्वे उपचार झाले पाहिजेत. त्याकरिता योग्य त्या तपासणी करून व्यवस्थित निदान झाल्यास उपचार सोपे होतात.
आवाजाला विश्रांती द्यावी. आवाजाचा उपयोग व दुरूपयोग दोन्ही टाळावेत. घशावर ताण येईल अशा पध्दतीने न बोलता हळू बोलावे तेही आवश्यक असल्यास कुजबुजल्यासारखे बोलण्याने स्वरतारांवर जास्त ताण येतो. हे लक्षात ठेवावे.
गरम पाण्याची वाफ तोंडाने व नाकाने घेतल्याने घशातील ताण बर्‍यापैकी कमी होतो.
होमिओपॅथिक उपचार- होमिओपॅथिव्दारे साध्या घसा बसण्यापासून ते नस निकामी होण्यापर्यंतच्या सर्व व्याधींवर उपचार शक्य आहेत. अतिप्रमाणात आवाज वापरल्यावर घसा बसल्यास ’अर्निका’ हे औषध गुणकारी आहे. गायकांमध्ये घसा बसल्यावर उपयुक्त ठरणारे हे खास औषध आहे. हे औषध गाण्याच्या कार्यक्रमाआधी घेतल्याने आवाज छान मोकळा होतो.

-डॉ सोनाली सरनोबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.