राज्य सरकार आणि इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ISDC यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP वर चर्चा करण्यासाठी पहिली परिषद आयोजित करण्यात आली होती.
‘उच्च शिक्षणाच्या भविष्याची रणनीती ठरवण्यासाठी एनईपी’ या परिषदेचे उद्घाटन करताना, उच्च शिक्षण मंत्री डॉ सी एन अश्वथ नारायण यांनी, एनईपीच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील रोजगार दर वाढेल.अशी खात्री व्यक्त केली आहे.
हे धोरण विद्यार्थी पदवीधर होईपर्यंत त्यांच्या रोजगारक्षमतेची पातळी निश्चितपणे वाढवेल. सध्या उमेदवारांची रोजगारक्षमता पातळी सुमारे 20 टक्के आहे आणि उच्च शिक्षणात या धोरणाच्या अंमलबजावणीसह ती वाढविली जाईल,” असे मंत्री म्हणाले.
या धोरणाच्या च अंमलबजावणीमुळे शिक्षणाचे व्यावसायीकरण होणार असल्याच्या आरोपांना नकार देताना मंत्री म्हणाले, “वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आणि सरकारी संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांसाठी हे धिरण अधिक फायदेशीर ठरेल. यात शिक्षणाच्या व्यापारीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही.