आपल्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्याचा एका अल्पवयीन मुलाने थेट काटा काढला आहे. खानापूर तालुक्यातील बेडरहट्टी गावात ही घटना घडली.
कल्लाप्पा पूंनाप्पा पुजारी (वय 51)असे मयताचे नाव आहे.
संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर कल्लाप्पा ने तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. याचा सर्वत्र बोभाटा झाल्यामुळे तिच्या मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने त्याचा खून केल्याची माहिती हाती आली आहे.
खून करणारा मुलगा अल्पवयीन आहे. आपल्या आईला त्या व्यक्तीसोबत विचित्र अवस्थेत पाहिल्याने त्याने हे कृत्य केले असावे अशी शक्यता असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नंदगड पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली आहे.
पोलीस निरीक्षक एस बी मालगोंड पुढील तपास करीत आहेत.