स्वरानिश आणि शिवपरा स्टुडिओ घेऊन आले आहे एक नव्या युगाची विश्वप्रार्थना!या विश्वप्रार्थनेचे संगीत संयोजन आपल्या बेळगावचा सुपुत्र अनिश सुतार याने केले आहे. ही आहे दिवाळीतली मान उंचावणारी बातमी.
मागील दोन वर्षांपासून अख्या जगाने कोरोनाचा सामना केला आहे.जगाचे कल्याण व्हावे आणि सर्वत्र समृद्धी नांदावी असा या प्रार्थनेचा सार आहे. याचे संगीत दिग्दर्शन व संगीत संयोजन अनिश सुतार यांचे असून पुण्यातील प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे यांनी ही प्रार्थना गायली आहे.शब्द डॉ संजीवनी खंडागळे यांचे आहेत.
या गाण्यात मोहनवीणा या विशेष वाद्यासह व्हायोलिन चा खुबीने वापर केला आहे.अनुक्रमे मानस गोसावी आणि कल्याणी मुजुमदार यांनी ही वाद्ये वाजवली आहेत.केदार धरवाडकर यांनी निर्मिती केली आहे तर अजय अत्रे यांनी ध्वनी मिश्रण केलं आहे. रुद्राणी, आदित,आरोही या लहान गायकांनी कोरस गायले आहे.
या गाण्याची टीम मोठी असून मुंबई, पुणे, बेळगाव, हैद्राबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येऊन या गाण्याची निर्मिती केली आहे.अत्यंत श्रवणीय आणि अर्थपूर्ण असे हे गाणे रसिकांना स्वरानिश आणि शिवपरा युट्युब चॅनेल वर ऐकता येणार आहे.