Tuesday, May 14, 2024

/

कर्नाटक या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी देणार ‘फ्रीशिप कार्ड’

 belgaum

विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यात होणारा विलंब दूर करण्यासाठी, अनुसूचित जाती समुदायातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती हस्तांतरित करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून ‘फ्रीशिप कार्ड’ दिले जाणार आहे.

समाजकल्याण विभागाचे उपसंचालक सिद्धलिंगेश यांनी ही माहिती दिली आहे. हे कार्ड शैक्षणिक संस्थांना शुल्क भरण्यासाठी सरकारी हमी म्हणून काम करेल आणि संस्थांनी अशा विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करण्याचा आग्रह धरू नये असे सांगण्यात आले आहे. फ्रिशिप कार्ड हेच शैक्षणिक शुल्क म्हणून ग्राह्य धरण्यात यावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

“तांत्रिक त्रुटींमुळे शिष्यवृत्तीची रक्कम भरण्यास उशीर होतो आणि विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी सादर केलेल्या अर्जांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यास विलंब होत आहे. असंख्य विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एकदा विद्यार्थ्याने प्रवेश मिळवला की, सरकार शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या आधार-सीडेड बँक खात्यात जमा करेल. त्यानंतर विद्यार्थी ही रक्कम कॉलेजला देऊ शकतो. डेबिट अर्थात एटीएम कार्ड वापरून ही रक्कम महाविद्यालयात हस्तांतरित करता येऊ शकते.अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 belgaum

समाजकल्याण विभाग मॅट्रिकोत्तर आणि प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीशी संबंधित सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी मोहीम राबवणार आहे, प्रथम श्रेणीत पहिल्याच प्रयत्नात अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना बक्षीस रक्कम आणि आंतरजातीय विवाहांसाठी 17 नोव्हेंबरपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.
दक्षिण कन्नडमध्ये ही मोहीम महिनाभर चालणार असल्याचे सिद्धलिंगेश यांनी सांगितले.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याबाबतही जनजागृती केली जाईल, असे ते म्हणाले. आवश्यक असल्यास, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मदत करण्यासाठी विभाग महाविद्यालयांमध्ये शिबिरे आयोजित करेल.विभागाला मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी 14,241 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 14,131 अर्ज मंजूर झाले आहेत. उर्वरित मोहिमेदरम्यान मंजूर ​​केले जातील. मॅट्रिकोत्तर श्रेणीमध्ये जिल्ह्यातील विभागाकडे 5,096 अर्ज प्राप्त झाले असून, 4,499 अर्ज मंजूर झाले आहेत. मॅट्रिकनंतरचे काही अभ्यासक्रम नुकतेच सुरू झाले आहेत आणि शिष्यवृत्तीचे अर्ज विभागाला प्राप्त झालेले नाहीत, असे सिद्धलिंगेश यांनी सांगितले.
पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षिसाच्या रकमेअंतर्गत, दक्षिण कन्नडमध्ये एकूण 1,049 अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यापैकी 121 नाकारण्यात आले आहेत कारण विद्यार्थी एका सेमिस्टरमध्ये एक विषय पास करू शकले नाहीत. आधीच ५५२ अर्ज मंजूर झाले असून ३७६ प्रलंबित आहेत.

योजनेंतर्गत, 60 टक्के ते 75 टक्के गुण मिळवणाऱ्या एसएसएलसी विद्यार्थ्यांना 7,000 रुपये, तर 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपये मिळतील. पीयूसी विद्यार्थ्यांना 20,000 रुपये, पदवी विद्यार्थ्यांना 25,000 रुपये, पीजी विद्यार्थ्यांना 30,000 रुपये आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 35,000 रुपये मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंतरजातीय विवाहांतर्गत प्रोत्साहनासाठी 28 अर्ज प्राप्त झाले असून 23 मंजूर झाले आहेत. उर्वरित पाच मोहिमेदरम्यान मंजूर ​​केले जातील, असेही सिद्धलिंगेश यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.