रमेश जारकीहोळी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा विश्वासघात केलाय असं लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तेंव्हा का म्हटलं नाही असा सवाल भाजप नेते मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी विचारला आहे.
बेळगावात विधान परिषद निवडणुकीत प्रचाराला आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.ज्यावेळी रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेस सोडली तेंव्हा विश्वासघात आठवला का? कोणत्याही परिस्थितीत रमेश जारकीहोळी भाजपचा विश्वासघात करणार नाहीत त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं खुलेआम त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आहे पाहिलं मत भाजपला दुसरं मत काँग्रेसला पाडवायला. असे म्हणत ईश्वरप्पा यांनी एक प्रकारे रमेश जारकीहोळी आणि लखन जारकीहोळी यांना पाठिंबाचं दिला आहे.
भाजप मध्ये विधान परिषद निवडणुकी वरून कार्यकर्त्यांत कोणताही गोंधळ नाही आम्ही सरळ सरळ भाजपला जिंकवणार आहोत ग्राम पंचायती पासून पंतप्रधाना पर्यंत भाजपा एक आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.
बोंम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वच क्षेत्रात विकास काम करत आहे विशेषतः ग्रामीण विकास विभागात त्यांनी आघाडी घेतली आहे जनजीवन मिशन आणि नरेगाची कामे व्यवस्थित चालली आहेत. फक्त टीका करायची काँग्रेस टीका करत असून विरोधी पक्षाची भूमिका निभावत आहेअसे ते म्हणाले.