कर्नाटक विधानसभा अधिवेशन काळात बेळगावच्या डॉ बी आर आंबेडकर मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्किंग केले जाऊ नये हा भाग नो पार्किंग झोन म्हणून राखीव करण्यात यावा अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
या मार्गावरील इस्पितळे आणि इतर व्यापारी वर्गाला त्या संदर्भातील नोटीस देण्यात आल्यानंतर आता या निर्णयाबद्दल संताप व्यक्त होत असून संबंधित व्यापाऱ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडेच धाव घेतली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार डॉ बी आर आंबेडकर रोड नो पार्किंग झोन असेल तर या भागातील व्यापार, व्यवसाय आणि इस्पितळे कशी चालवायची? आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांनी आपली वाहने नेमकी कुठे पार्क करायची? असा सवाल संबंधितांनी केला आहे.
Sir Sincere request on behalf of all the biz owners of Ambedkar road Bgm, As we got notice from city police to not park vehicle on said road due to sessions,it is extremely painful for customers of our shops, hence kindly look into the matter & help. @CMofKarnataka @BSBommai
— Rahul Raibagi (@raibagi_rahul) November 26, 2021
नो पार्किंग झोन ठीक आहे मात्र पार्किंग कुठे करायचे यावर ही प्रशासनाने पर्याय देण्याची गरज आहे. अन्यथा फक्त नो पार्किंग झोन जारी करून मार्ग मोकळा होत नाही. त्याचाही विचार प्रशासनाने करावा. असे म्हणणे येथील व्यापाऱ्यांनी मांडले आहे.
सर्व बिजनेस ओनर्स च्या वतीने ,आम्ही विनंती करत आहोत त्या अधिवेशन काळात संबंधित रोड नो पार्किंग झोन करण्याच्या बेळगाव पोलिस प्रशासनाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे करण्यात आली आहे.