समर्थ नगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांना घराबाहेर पडले मुश्कील बनले आहे. सकाळपासून याभागात पिसाळलेल्या कुत्र्याने जवळपास 6 जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पिसाळलेल्या कुत्र्याने पाळीव कुत्र्यांच्या दोन लहान पिल्लांचा देखील चावा घेतल्याने ते मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळपासूनच पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने परिसरात धुमाकूळ घालत प्रवीण पाटील, रेणुका झाजी, रमेश कुंटे, प्रियंका करेगार यासह अन्य दोघांचा चावा घेतला आहे.
समर्थ नगर मध्ये जवळपास 20 ते 25 भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. यातील एक कुत्रा पिसाळलेला असल्याने या बाबत महानगरपालिकेला कळविले आहे.
मात्र महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे या पिसाळलेल्या कुत्र्याचा आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे..