Saturday, April 27, 2024

/

लवकरात लवकर घ्या महापौर निवडणूक

 belgaum

महानगरपालिकेची निवडणूक होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला मात्र अद्याप महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली नाही. कौन्सिल बनली नाही त्यामुळे काम करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर महापौर आणि उपमहापौर निवडणूक घ्यावी अशी मागणी नगरसेवकरवी साळुंके, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, शंकर पाटील यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे केली आहे.

या संदर्भातील एक निवेदन प्रादेशिक आयुक्तांना देण्यात आले. आपण नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत .अडीच महिने झाले मात्र ही निवडणूक घेता येत नाही का असा प्रश्न नागरिक आम्हाला विचारत असून अशा प्रकारची मागणी लवकरात लवकर तुम्ही प्रशासनाकडे करावी, असेही नागरिक म्हणत आहेत.

अनेक कामे खोळंबली आहेत प्रशासनाला आदेश देण्याचे अधिकार नगरसेवकांना अद्याप मिळाले नाहीत. अशा परिस्थितीत नगरसेवकांची परिस्थिती बिकट बनली असून लवकरात लवकर ही कामे करून घ्या अशी जनतेची मागणी येत आहे.Corp

 belgaum

तुम्हाला निवडून देणाऱ्या नागरिकांनिः कामे करावी का असा प्रश्नही लोक विचारू लागले असून आता आम्ही प्रत्यक्षात कामाला सुरू करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. याकडे या नगरसेवकांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान राज्य सरकारने निवडणुकीचा आदेश दिला तर तात्काळ निवडणूक घेऊ असे आश्वासन प्रादेशिक आयुक्तांनी नगरसेवकांना दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.