Wednesday, December 25, 2024

/

जिल्हा सिरत कमिटीचे राष्ट्रपतीना निवेदन

 belgaum

इस्लाम धर्माचे पूज्य मोहम्मद पैगंबर यांचा वारंवार केला जाणारा अवमान आणि त्रिपुरा येथे मुस्लिमांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी. तसेच त्रिपुरा सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा सिरत कमिटीने एका निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.

बेळगाव जिल्हा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ते निवेदन तात्काळ राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले.

या घटनेचा निषेध म्हणून खडे बाजार परिसरातील दुकानं देखील मुस्लिम समाजाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

कांही निवडक लोकांकडून देशांमध्ये जाणीवपूर्वक भीतीदायक वातावरण निर्माण केले जात असून समाजात फूट पाडून शत्रुत्व व चीड निर्माण केली जात आहे. सतन वासिम रिझवी यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाने तर मुस्लिम समाजाला मोठा धक्का बसला आहे. या पुस्तकातील मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतच्या अवमानकारक लिखाणामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुखवट्याखाली कांही अतिरेकी विचारसरणीच्या लोकांकडून हे प्रकार होत असून विद्यमान सरकार देखील याकडे दुर्लक्ष करत आहे.

यासाठी आपण सर्वोच्च अधिकार प्राप्त व्यक्ती असल्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की सतन वासीम रिझवी आणि नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या विरोधात झालेल्या हिंसाचारास जबाबदार असणारे त्रिपुरा सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी.

त्रिपुरा हिंसाचाराचे बळी ठरलेल्या लोकांना नुकसानभरपाई दिली जावी. ज्या मशिदींचे नुकसान झाले आहे, त्यांची दुरुस्ती राज्यसरकारने स्वखर्चाने करून द्यावी. हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले अंजुमन फरोग ई इस्लाम संघटनेचे अध्यक्ष मौलाना कोमर गणी उसनानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची तात्काळ मुक्तता करून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेतले जावेत, अशा आशयाचा तपशील बेळगाव जिल्हा सीरत कमिटीतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.