Friday, January 10, 2025

/

बेळगाव बार असो.च्या निवडणुकीसाठी 34 जण रिंगणात

 belgaum

बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुक रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र आज गुरुवारी स्पष्ट झाले असून एकूण 34 उमेदवार या निवडणूक रिंगणात आहे. या निवडणुकीत बार असोसिएशनचे अध्यक्षपद वगळता अन्य सर्व पदांसाठी बहुरंगी लढत होणार आहे.

बेळगाव बार असोसिएशन निवडणुकी साठी दाखल झालेले सर्व अर्ज काल बुधवारी वैध ठरवण्यात आल्यामुळे पात्र उमेदवारांची संख्या 37 झाली होती. आज गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यानुसार आज पात्र उमेदवारांपैकी तिघा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे 34 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.

यापैकी ॲड. दिनेश एम. पाटील आणि ॲड. प्रभू एस. यतनट्टी यांच्यात अध्यक्षपदासाठी समोरासमोर थेट लढत होणार आहे, तर अन्य पदांसाठी बहुरंगी लढत होणार आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या विविध पदांसाठी निवडणूक लढविणार्‍या रिंगणातील उमेदवारांची नांवे खालील प्रमाणे आहेत.

अध्यक्षपद -दिनेश एम. पाटील, प्रभू एस. यतनट्टी. उपाध्यक्षपद -सुधीर बी. चव्हाण, व्ही. आर. कामटे, अमित ए. कोकितकर, बसवराज एम. मुगळी, लक्ष्मण यल्लाप्पा पाटील, विनोद शंकरगौडा पाटील, सचिन आर. शिवण्णावर. जनरल सेक्रेटरीपद -सतीश गोपाळ बिरादार, शिवलिंगप्पा बुदिहाळ, वाय. के. दिवटे, रवींद्र आर. गुंजाळे, षडाक्षरी जी. पुजारी, गिरीश एन. पाटील जॉईंट सेक्रेटरीपद -बंटी आर. कपाही, श्रीधर एस. कुलकर्णी, निंगनगौडा पाटील, विश्वनाथ बी. सुलतानपुरी. व्यवस्थापकीय समिती सदस्यपद -मुरलीधर सी. भस्मे, आय. वाय. ब्याल, आनंद पी. घोरपडे, येसुनाथ एम. गुट्टेन्नावर, चंद्रशेखर के. हिरेमठ, रमेश पी मोदगेकर, सुरेश के. नागनुरी, आदर्श के. पाटील, महांतेश टी. पाटील, राकेश निंगनगौडा पाटील, पी. के. पवार, अभिषेक यु. उदोशी, विठ्ठल एन उप्पीन. महिला प्रतिनिधीपद -शकुंतला बाबू कांबळे, पूजा पाटील.

बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीचे निवडणूक निर्वाचन अधिकारी संजय तुबाची यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने निवडणूक रिंगणातील उपरोक्त वैध उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बेळगाव बार असोसिएशनची निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि त्यानंतर मतमोजणी होणार असून सुमारे 2 हजार मतदार 11 जणांच्या कार्यकारिणीची निवड करणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.