Friday, April 19, 2024

/

रहदारी पोलीस ‘या’ रस्त्याकडे लक्ष देतील का?

 belgaum

फोर्ट रोड येथील जिजामाता चौकापासून देशपांडे पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा बेशिस्तीने वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे रहदारीस होणाऱ्या अडथळ्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.

फोर्ट रोड येथील जिजामाता चौकापासून देशपांडे पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहने बेशिस्तीने पार्क केलेली असतात.

रहदारी पोलिसांचे देखील याकडे साफ दुर्लक्ष होत असते. या रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने आहेत. या ठिकाणी अनेक व्यवसाय चालतात.Traffic problem

 belgaum

पोलिसांचा वचक नसल्यामुळे या ठिकाणी येणारे वाहन चालक आपली वाहने रस्त्यावर मन मानेल तेथे पार्क करतात. विशेष करून चार चाकी वाहने रस्त्यावर बेजबाबदारपणे पार्क करण्यात येत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होण्याचा प्रकार या ठिकाणी वारंवार घडत असतो.

तरी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगला शिस्त लावावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.